सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींना दिव्य मराठी दैनिक मार्फत यशाचे शिलेदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यदुत सुपरिचित असणारे श्री सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉ जितेंद्र ठाकूर यांना त्यांच्या सामजिक आणि वैद्यकीय कार्याची दखल घेऊन दिव्य मराठी दैनिक मार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते संभाजीनगर येथे डॉ जितेंद्र ठाकूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आजपर्यंत 10 हजार पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवदान दिले आहे. आजवर हजारो आदिवासी, शेतकरी शेतमजूर , कामगार यांची मोफत शस्त्रक्रिया श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे येथे करण्यात आल्या. शेकडो च्या संख्येने मोफत आरोग्य शिबिरे घेतली. नेत्र तपासणी शिबिर घेऊन मोफत शस्त्रक्रिया देखील डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने करून देण्यात आले. शिरपूर तालुक्यातील 3 लाख 16 हजार लोकांचा अपघात विमा काढणारे डॉ जितेंद्र ठाकूर हे पहिले समाजसेवी ठरले. तेही कोणतेही पद नसतांना. तसेच आजवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना मदत मिळवून दिली. कोरोना महामारीत धुळे जिल्ह्यात पहिले खाजगी रुग्णालय श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल हे कोरोणा रुग्णांना उपचारासाठी ऊपलब्ध करून देण्यात आले. हजारो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. आताच मेंदू आणि मणक्यांच्या आजारांचे निदान व शस्त्रक्रिया करणारे शिबिर घेतले. या आणि यांसारख्या अनेक लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन संभाजीनगर येथे यशाचे शिलेदार हा राज्यस्तरीय पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभ हस्ते डॉ जितेंद्र ठाकूर यांना सहकुटुंब बोलाऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ जितेंद्र ठाकूर साहेब आपणास राज्यस्तरीय यशाचे शिलेदार पुरस्कार मिळाल्याबद्दल साहेबांचे खुप खूप अभिनंदन.
