जामन्यापाडा येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन




शिरपूर : तालुक्यातील मौजे जामन्यापाडा येथे कृषी संजीवनी मोहीमेनिमीत्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तुषार बैसाणे कृषी पर्यवेक्षक यांनी रासायनिक खत बचत मोहीम, पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी पायाभूत विकास निधी योजना, कापूस पिकातील मूल्य साखळी बळकटीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले तसेच कृषी सहायक शिवराज डी. माळी यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे खत व्यवस्थापन व कापूस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक आर के देशमुख यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, MREGS फळबाग लागवड, कृषी खात्यातील विविध योजनेची सविस्तर माहिती दिली.

               यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शिरपूर तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा, गावचे जेष्ठ व्यक्ती वेरसिंग पावरा, संपत पावरा, सतिलाल पावरा, केनसिंग पावरा, रमेश पावरा, कैलास पावरा आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने