संजय पाटील यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांची भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ओबीसी  मोर्चा , उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आले आहे.


याबाबत त्यांना पत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून आपल्या या नियुक्तीमुळे पक्षाची संघटनात्मक व रचनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल व पक्षाने दिलेली जबाबदारी आपण तन-मन लावून पूर्ण कराल व सशक्त भारत व सशक्त भाजपा करण्यासाठी आपण जबाबदारीने कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष श्री आर के माळी यांच्याकडून त्यांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले असून भारतीय जनता पार्टीचे खासदार संगम लाल गुप्ता राष्ट्रीय माजी मंत्री भाजप व श्री हंसराज भैय्या अहिर राष्ट्रीय उपाध्यक्ष भाज्या भाजप ओबीसी मोर्चा यांच्या शुभहस्ते संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.


त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना न्याय दिला व पक्षासाठी सेवा करण्याची संधी दिली मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करेल अशा शब्दात संजय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल आमदार अमरीश भाई पटेल , प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ चौधरी

आमदार काशीरामजी पावरा , भाईसाहेब भूपेश भाई पटेल, यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


 होळनांथे परिसर व हिसाळे परिसर व तालुकाभरातून व जिल्हाभरातून त्यांच्या यांनी नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने