शिवसेनेशी गद्दारी करणार नाही असे म्हणणार्‍या गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला झटका, तर पाटलांना पुन्हा टपरीवर बसवू शिवसेनेचा फटका

 



मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्यच्या घडामोडींमध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे खंबीर नेतृत्व व बुलंद तोफ म्हणून ओळख असणारे गुलाबराव पाटील यांनी यांनी देखील आपली भूमिका बदलून शिंदे गटात समाविष्ट झाल्याने जळगाव जिल्ह्यात चर्चांना उधाण आले असून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


आज पर्यंत आपल्या प्रत्येक भाषणातून शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही व मला जे काही मिळाले घडवले ते सर्व शिवसेनेच्या उपकार असून त्याची उपकार जन्मभर घडू शकत नाही अशा शब्दात बोलणारे प्रखरपणे शिवसेनेची निष्ठा आणि भक्ती असलेले कट्टर शिवसैनिक गुलाबराव पाटील अशी त्यांची ओळख होती. आपल्या भाषेत नेहमीच गुलाबराव पाटील मी पान टपरी चालवायचं आणी माझ्या बाप सालदार की करायचा असे सांगत असत.


विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडात जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेचे चार आणि अपक्ष एक असे पाच आमदार सहभागी झाले आहेत. मात्र मात्र शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गुलाबराव पाटलांना गुन्हा टपरीवर बसवु असे वक्तव्य काल दहिसरच्या सभेत शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांनी केले आहे.


शिंदे च्या बंडात जळगाव जिल्ह्यातून चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, लता सोनवणे हे आमदार पहिल्या दिवसापासून सहभागी होते दोन दिवस पक्षनिष्ठा जपल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे यांच्या गटात गेले .जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांमध्ये या बंडा बाबत कमालीची अस्वस्ता  असली तरी जिल्हाप्रमुख आणि बरेचसे प्रमुख पदाधिकारी सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत .


संभाव्य मंत्रिपदावरून शिंदे घडत गेलेल्या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये गुवाहाटी मधील हॉटेल मधील बाबासाहेबांची झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडिया चांगली होती मात्र याबाबत अधिक दुजोरा मिळू शकलेला नाही.


दुसरीकडे बंडखोर आमदार यांच्याबाबत शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली असून दहिसरच्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. आपणच शिवसेनेचे खरे वाघ आहोत असे सांगणारे आज पळून गेले असून पानटपरीवर बसणारा लोकांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले मात्र आता त्यांना पुन्हा पान टपरीवर बसायला लावू अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने