नवीन नाशिक सिडको परिसरात नंदी दुध पितो , भाविकांची गर्दी, सरफेस टेन्शन मुळे पाणी घेतले जाते,नंदीला बदनाम करु नका* -महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन .




नाशिक=नवीन नाशिक सिडको येथील श्री स्वामी समर्थ नगर येथे महादेव मंदिर येथे नंदी दुध पितो ह्यामुळे परीसरात बघण्यासाठी भाविकाची प्रचंड गर्दी झाली होती
पूर्ण भारतभर आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पिताना चा चमत्कार सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे .आणि मंदिरात भाविक रांगलावत पाणी पाजण्याचा चमत्काराचा अनुभव घेताना आढळून येत आहेत .कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणू चा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो .मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या  रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते .यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्राध्यपक दिगंबर कट्यारे यांच्या शी संवाद साधला असता नंदी किंवा गणपती पाणी दुध कधी पित नसतो.वैज्ञानिकदृष्ट्या पाण्याच्या पुष्टीय ताणाच्या अप्रभावामुळे हा प्रकार घडत असतो . पाणी आणि मुर्ती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्या काहीश्या आकर्षीत होऊ शकतात.साधा दगड देखील सुध्दा एक किंवा दोन थेंब पाणी आत मध्ये घेऊ शकतो सोशल मीडियाचा गैरवापर करीत अफवा पसरवली जात असुन नागरिकांचा श्रद्धेचा उपयोग केला जात आहे नंदी पाणी पितो असे कोणी सिध्द केल्यास त्याला एकवीस लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असे कट्यारे यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने