शिरपूर -तालुक्यातील तांडे शिवारातील महाकॉट कंपनीच्या भिंतीस लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ९६० किलो तांब्याच्या तारेसह ऑईल चोरी झाल्याची घटना घडली आहे.
शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारात असलेल्या महाकॉट कंपनी व्यवस्थापकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कंपनीच्या भींतीस लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील ९६० किलो तांब्यांच्या तारेसह ४० हजार रूपये किंमतीचे ५०० लिटर ऑईलची चोरी करण्यात आली आहे. याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द दि 2 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, सपोनि. उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.
Tags
news
