मुकेश पटेल सीबीएसई स्कूल मध्ये एस.व्ही.के.एम. मुंबई व ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडियाच्या स्व. मम्मीजी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळाडूंनी दाखवली चुणूक, धुळे जिल्ह्यातील खेळाडूंची उत्तम कामगिरी



शिरपूर : मुकेश पटेल सीबीएसई स्कूल मध्ये एस.व्ही.के.एम. मुंबई व ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मम्मीजी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संस्था अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्था सह-अध्यक्ष तथा ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
उत्साहात संपन्न झाली असून धुळे जिल्ह्यातील 49 संघातील 850 खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

एस.व्ही.के.एम. मुंबई व ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तांडे ता. शिरपूर येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या मैदानावर दि. 2 मार्च पासून 4 मार्च पर्यंत जिल्हास्तरीय दिवसरात्र  फुटबॉल स्पर्धा भरविण्यात आल्या. शुक्रवारी 4 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता स्कूलच्या मैदानावर बीसीसीआय माजी संचालक व एस. व्ही. के. एम. स्पोर्टस ॲडव्हायजर नवीन शेट्टी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप करण्यात आला. मान्यवर यांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती, सरस्वती माता मूर्ती व स्व. मुकेशभाई पटेल प्रतिमा पूजन झाले.

यावेळी बी.सी.सी.आय. माजी संचालक नवीन शेट्टी, शिरपूर कॅम्पस मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे, हस्ती बँक चेअरमन कैलास जैन, ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन इंडिया सीईओ बाबा बाविस्कर, असोशिएशन इंडिया खजिनदार भालचंद्र सोनगत, असोशिएशन इंडिया सचिव रजनीकांत पाटील, शैलेंद्र अग्रवाल, जाकीर शेख, प्राचार्य पी. सुभाष, प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य सुनंदा मेनन, प्राचार्या रथी नायर, प्राचार्या भूमिका गर्ग, उपप्राचार्य अनिता थॉमस, संजय चौधरी, भालेराव माळी, असोसिएशन महाराष्ट्र संचालक हुसेन चाऊस, ज्यूली चाको, एस. व्ही. के. एम. स्पोर्ट डायरेक्टर किरण मुंबई, क्रीडा संचालक संतोष उदनिया, क्रीडा उपसंचालक अभय कचरे, मोहित जैन, पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, फुटबॉल संघ पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.

नवीन शेट्टी म्हणाले, अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांचे खूप आभार की त्यांच्या प्रयत्नाने शिरपूर व जिल्ह्यातील खेळाडू यांना खेळाचे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. फुटबॉल स्पर्धा उत्तम पद्धतीने संपन्न झाल्या, भाईंचे योगदान खूपच आहे, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात खूप संधी आहेत, तुमच्या आवडीच्या खेळात लक्ष केंद्रित करा, यश निश्चितच तुमच्या सोबत आहे. यावेळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्या निधनामुळे सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

कैलास जैन म्हणाले, मुकेशभाई पटेल यांना वंदन करतो. भाईंच्या प्रयत्नाने फुटबॉल स्पर्धांचे खूपच सुंदर नियोजन आहे. स्पर्धा राबविणे सोपे नसते, यशस्वी नियोजन, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, खेळाडू, मॅनेजर, शिक्षक, रेफरी सर्वांचे अभिनंदन. भाईंनी मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला, स्पोर्ट मध्ये खेळाडू यांना खूप करिअर आहे.

प्राचार्य पी. सुभाष म्हणाले, धुळे जिल्ह्यातील 49 संघांचे 850 खेळाडू सहभागी झाले असून 19 वर्षे खालील, 17 वर्षे खालील, 14 वर्षे, 12 वर्षे खालील संघांचा समावेश होता. खेळाडू यांच्या क्रीडा विकासासाठी एस. व्ही. के. एम. अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिश भाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे खूपच प्रयत्न आहेत. मुकेश पटेल सीबीएसई निवासी स्कूल मध्ये 1.25 लाख स्क्वेअर फूटचे इनडोअर स्टेडियम चे काम जोमाने सुरु आहे. आभार संतोष उदनिया यांनी मानले.

गणेश वंदना समूह नृत्य मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या चिमुकले विद्यार्थी यांनी सादर केले तर मुकेश पटेल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी "तू प्यार का सागर है" गीत गायन व संगीत साथ दिली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बक्षिस वितरण करून यशस्वी संघ व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी फुटबॉल संघ व खेळाडू यांचा सन्मान :

12 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरच्या संघाने विजयश्री प्राप्त केली. या संघाला 7,777 रुपयांचे रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रथम उपविजेता म्हणून हस्ती स्कूल धुळे संघाला 5,555 रुपयांचे रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तसेच द्वितीय उपविजेता संघ म्हणून एच. एस. ए. धुळे संघाला 3,333 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या शिरपूर संघातील मुकुंद पावरा या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन "प्लेयर ऑफ द टुर्नामेँट" हा बहुमान प्रदान करण्यात आला. एच. एस. ए. धुळे संघाच्या शिफान शेख या खेळाडूला 1,100 रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन "गोल्डन बुट" साठी घोषित करून त्याचा सन्मान करण्यात आला तर के. व्ही. टी. आर. शिरपूर संघाला 2,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचा विजेता म्हणून शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरच्या संघाला विजेता घोषित करून 11,111 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांनी गौरविले. प्रथम उपविजेता संघ म्हणून एस. व्ही. के. एम. संघाला 7,777 रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तसेच द्वितीय उपविजेता संघ म्हणून हस्ती स्कूल धुळे संघाला 5,555 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पोर्ट्स मानिया धुळे संघाला 2,100 रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर च्या मानस पाटील या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन "प्लेयर ऑफ द टुर्नामेँट" तसेच के. व्ही. टी. आर. शिरपूरचा वैभव सोनवणे या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन "गोल्डन बुट" ने सन्मानित करण्यात आले.

17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर च्या संघाला 11,111 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विजेता संघ म्हणून बहुमान प्रदान करण्यात आला. तसेच प्रथम उपविजेता संघ म्हणून एस. व्ही. के. एम. शिरपूरच्या संघाला 7,777 रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन व द्वितीय उपविजेता संघ म्हणून शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरच्या संघाला 5,555 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन बहुमान प्रदान करण्यात आला. हस्ती स्कूल धुळे संघाला 2,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन "फेअर प्ले अवॉर्ड" देऊन गौरविण्यात आले तर शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरच्या निखिल माळी या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन "प्लेयर ऑफ द टुर्नामेँट" व हस्ती स्कूल धुळे संघाच्या प्रणव पवार या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन "गोल्डन बुट" अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

गर्ल्स ओपन कॅटेगिरी मध्ये शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या शिरपूर संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. तसेच प्रथम उपविजेता संघ म्हणून एस. व्ही. के. एम. शिरपूर संघाला गौरविण्यात आले. शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर संघातील कविता चौधरी या खेळाडूला "प्लेयर ऑफ द टुर्नामेँट" तसेच एस. व्ही. के. एम. शिरपूर संघातील धारा पटेल या खेळाडूला "गोल्डन बुट" अवार्ड देऊन गौरविण्यात आले.


19 वर्षे खालील मुलांच्या गटात अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विजेता संघ म्हणून रु.  21,000 चे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पोलिस लाइन फुटबॉल क्लबच्या संघाला गौरविण्यात आले. प्रथम उपविजेता संघ म्हणून रु. 11,000 चे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या संघाला तसेच द्वितीय उपविजेता संघ म्हणून 7,000 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कनोसा फुटबॉल क्लब धुळे संघाला सन्मान प्रदान करण्यात आला. एस. व्ही. के. एम. संघाला "फेअर प्ले पुरस्कार" देऊन रु. 2,100 रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. "गोल्डन बूट" अवॉर्ड रु. 1,100 निशांत वसावे व "स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू" रु. 1,100 रोहित शिंदे या खेळाडूंना बहुमान देण्यात आला.


उत्तम कामगिरी केल्याने सिनियर गटातून पोलीस बॉईज क्लब धुळे संघाला 21,000 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन विजेता संघ म्हणून गौरविण्यात आले. प्रथम उपविजेता संघ म्हणून चॅम्पियन्स क्लब धुळे संघाला 11,000 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तर द्वितीय उपविजेता संघ म्हणून एस. आर. पी. एफ. क्लब धुळे संघाला 7,000 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन बहुमान प्रदान करण्यात आला. साक्री फुटबॉल क्लब धुळे संघाला 2,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह प्रशस्तिपत्र देऊन "फेअर प्ले अवॉर्ड" ने सन्मान करण्यात आला. तर चॅम्पियन्स टीमच्या अक्षय पाटील या खेळाडूला 1,100 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन "प्लेयर ऑफ द टुर्नामेँट" व एस. आर. पी. एफ. क्लब धुळे संघातील संदीप जगताप या खेळाडूला 1,100 रुपये रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन "गोल्डन बूट" अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.

सर्व यशस्वी संघ व खेळाडूंचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष तथा ॲम्युचर फुटबॉल असोशिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेशभाई पटेल व पदाधिकारी यांनी कौतुक केले असून भावी उज्वल भविष्यासाठी, यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
…… 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने