दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचात पोलिस सुस्त चोर मस्त
शहरात चोरीची प्रवृत्ती वाढत असल्याने आता दिवसा पाळत ठेऊन भर दुपारी घर फोडून एक लाखाच्या आसपास सोने चांदीच्या दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरातील झांबरसिंग (उर्फ कुंदन) चंद्रसिंग गिरासे रा. डी. जी.नगर दोंडाईचा हे नेहमी ओम डिजीटल येथे व्यवसायावर होते. तर त्यांची पत्नी अडिच वाजेच्या सुमारास नातेवाईकांना दवाखान्यात घेऊन गेल्याने बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी संधी साधत १७ ग्रॅम सोने व
३० भार, चांदी चोरून नेली आहे. पत्नी दवाखान्यातून घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले.. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते घटनेची दाखल पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..
Tags
news
