शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी रणवीर राजपूत यांनी ठाणे जिल्ह्यात केली पुरस्कारांची हॅट्रीक*




ठाणे,दि.४ : मंत्रालयातल्या माहिती व जनसंपर्क विभागातील निवृत्त प्रसिद्धी अधिकारी रणवीर राजपूत यांना ठाण्याचे महापौर श्री. नरेशजी म्हस्के यांच्या हस्ते *ठाणे गौरव पत्रकारिता पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.शाल,पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा महापौर दालनात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.संदीप माळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री.रणवीर राजपूत हे २००८ साली जिल्हा माहिती अधिकारीपदी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गेल्या १३ वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करत आहेत.ठाणे जिल्ह्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात ते सक्रिय असून,कोरोना काळात जनजागृती मोहिमेत भरीव योगदान दिले.दरम्यान ते स्वतः कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्या समर्पित सामाजिक कार्याबद्दल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री,रुग्णदुत श्री.एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते त्यांना *कोविड योद्धा सन्मान पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.तर कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रातील *जीवन गौरव पुरस्कार* प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यापाठोपाठ ठाण्याचे महापौर श्री.नरेशजी म्हस्के यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या कोरोना जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग दिल्याबद्दल राजपूत यांना *ठाणे पत्रकारिता सन्मान पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.शासकीय सेवेतून रिटायर्ड झाल्यावर विश्रांतीचा मार्ग न अवलंबिता,त्यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन करून पत्रकार राजपूत यांनी गेल्या वर्ष भरात लागोपाठ तीन  पुरस्कार पटकावले.अन् खान्देशच्या सुपुत्राने  आपल्या गुणवत्तापूर्ण पत्रकारितेचा झेंडा ठाणेसह कोंकणात रोवून धुळे- नंदुरबार जिल्ह्यांच्या वैभवात मानाचा शिरपेच खोवला आहे.पत्रकारिता क्षेत्रात  अद्वितीय व अतुलनीय कामगिरी करणारे रणवीर राजपूत हे मूळचे दाऊळ - मंदाणे येथील रहिवाशी असून,सुरायचे जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते कै.पदमसिंग(पदममास्तर)  गिरासे यांचे ते जावई आहेत.

पत्रकारिता क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून शिंदखेडा तालुक्याचे नाव अजरामर केल्याबद्दल माजी पर्यटन मंत्री अन् शिंदखेडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री.जयकुमार रावल यांनी पत्रकार रणवीर राजपूत यांचे अभिनंदन केलं आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने