मुंबई - महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष व एकमेकांवरील टीका टिप्पणी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून एकमेकांना विरोध करण्याच्या भूमिकेतून अभूतपूर्व अशा घटना समोर येत आहेत काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह होशियारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध सध्या होत असून आघाडी सरकारच्या सर्वपक्षीय आमदारांकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे व या प्रकरणात माफी मागण्याची मागणी होत आहे त्याचेच पडसाद आज विधिमंडळात देखील उमटले आहे
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे अधिवेशनही वादळी ठरत आहे. आज पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गदारोळ झाला.
या गदारोळामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण थांबवून सभागृहातून काढता पाय घेतला. राष्ट्रगीत होण्याची वाट न पाहता राज्यपालांनी काढता पाय घेत महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे महाविकास आघाडीच्या आमदारांनी म्हंटले आहे. दरम्यान राज्यपालांचा धिक्कार असो अशा घोषणा देत विधिमंडळाच्या पायरीवर सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे आमदार संजय दौंड यांनी खाली डोकं वर पाय असे शीर्षासन करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध केला आहे.
याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Tags
news
