विहिरीत पडलेल्या गोवंशाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिले जीवनदान मलकापूर - उमेश इटणारे




 मलकापूरातील बोदवळ रोड जवळील गणपती नगर भाग 3 मागील विहिरीत रात्री 11 वाजताच्या सुमारास गोवंश विहिरीत पडला सकाळी 11 वाजता परिसरातील व्यक्‍तींना गोवंश  विहिरीत पडलेल्या अवस्थेत दिसला परिसरातील लोकांनी याबाबतची माहिती गौरक्षण सेवा संस्थान बेलाड चे  किरीट पोपट यांना दिली किरीट पोपट यांनी मलकापूर येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याबाबत ची माहिती देऊन मदतीची मागणी केली जेसिबी घेऊन बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून रितेश दहिभाते, सुयोग शर्मा, यांनी गोवंश दोरीला बांधून जेसिबी च्या साह्याने गोवंश ला सुरक्षित बाहेर काढले
तानासिहं ठाकूर, किरीट पोपट, रितेश दहिभाते, आनंद कुमार शर्मा, दिपक कपले, सुयोग शर्मा, गौरव अकोटकर, सोमेश चोपडे, अभिजित अकोटकर, स्वप्नील भगत, गोलू कुदळे, कृष्णा तायडे, रामसिंह हजारी,व इतर सर्व पशु प्रेमी व बजरंग दल यांचे विशेष सहकार्य राहिले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने