*रोटरी स्कूलमध्ये शालेय स्तरावर गणित प्रदर्शन* दोडाईचा अख्तर शाह




 दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व लक्षात घेऊन विदयार्थ्यांमधील सर्जनशिलतेला चालना मिळावी म्हणून शालेय स्तरावर गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन दादासाहेब रावल महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सी.एम.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री एम. पी. पवार, सौ हेतल शाह, वैशाली शाह उपस्थित होते.
          या प्रदर्शनात 250 विद्यार्थ्यांनी चढता क्रम, उतरता क्रम,जागेची किंमत,भारतीय चलन, गणिती खेळ, गणिती कोडी, गणितीय क्रिया व भौमितिक आकृत्यांवर आधारित तक्ते, पोस्टर, प्रतिकृती व उपकरणांद्वारे गणिताचे मर्म परीक्षक व निरीक्षण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांना उलगडून दाखविले. 
       या प्रदर्शनात इ.1ली व 2    रीच्या गटात कृष्णा गुरव,श्रेय     चौधरी व हिमेश मराठे प्रथम, आदित्य रूपचंदानी व परिधी रुपचंदाजी द्वितीय, राजवीर चोळके व अनुज बडगुजर तृतीय. इ.4 थी व 5 वीच्या गटात मधुलिका गिरासे व किरण धनगर प्रथम, पूर्वा सोनवणे व अक्सा पठाण द्वितीय, दिव्यानी खैरनार व कनिष्का बागुल आणि तेजस्विनी शिरसाठ व साची दानानी तृतीय. इ.5 वी व 6 वीच्या गटात दिव्या कुवर व झोया खाटीक प्रथम, विभा गिरासे द्वितीय, कौस्तुभ पाटील व श्रेयस माळी तृतीय तर 7 वी ते  9 वीच्या गटात अंकिता बडगुजर प्रथम, उन्नती जैन व तनवी चोळके द्वितीय, निखील सोनवणे व प्रथम ठाकूर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.परीक्षक म्हणून श्री हर्षल गुप्ता, श्री हरेश दानानी, सौ. अनिता शिंदे व सुचेता पाटील यांनी काम पाहिले
        प्रमुख पाहुणे डॉ. सी. एम. जाधव यांनी रोटरी स्कूलच्या विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन स्वत:ची व शाळेची गुणवत्ता सिद्ध करत असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने गणितातील संबोध, संकल्पना व सूत्रे समजून घेऊन गणिताची भीती दूर करावी. नियमितपणे अभ्यास करून शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केले.
       विदयार्थ्यांच्या सर्जनशील व विश्लेषणात्मक विचार कौशल्यांना उत्तेजन मिळावे आणि त्यांना त्यांच्या एकात्मिक ज्ञानाचा वापर करता यावा. यासाठी शाळेत प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे प्राचार्य श्री एम. पी पवार यांनी सांगितले.
        विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी डॉ. राजेश टोणगांवकर, प्राचार्य श्री एम. पी. पवार व पालकांनी अभिनंदन केले.
        प्रदर्शनात भाग घेतलेल्या सर्व विदयार्थ्यांना गणित विभाग प्रमुख इम्रान अन्सारी व गणित विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
        प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने