चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारातील वाळकी येथील शैतकरी प्रकाश सुधाकर पाटील यांच्या शेतात साधारण ४ /६ एकरवर अफुची लागवड केल्याचे आढळून आले.अफु शेतीच्या आजुबाजुला मका या पिकाची शेती असल्याने अफुची शेती निदर्शनास येत नव्हती.प्रकाश पाटील याने स्वताच्या शेतीसह जुप म्हणून केलेल्या शेतीत अफुची लागवड केलेली असुन डीसेंबर महीन्यात लागवड केलेली असल्याचे व १० ते १५ दीवसांनी पीक हातात येणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आतापर्यंतची जळगाव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी सांगितले.
संशयीत आरोपी प्रकाश पाटील यास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुंणगर यांनी ताब्यात घेतले.
जळगाव पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,
चोपडा पोलीस उपअधीक्षक भास्कर ढेरे पथकासह हजर होते. यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक देविदास कुणगर,सपोनि अमरसिंग वसावे व कर्मचारी यांनी ही धडक कार्यवाही केली.
चोपडा महसुलचे सर्कल, तलाठी,कृषी अधिकारी प्रशांत देसाई,कृषी सहायक जे व्ही सनेर, जळगाव फोरेन्सिक लॅबचे विकास वाघ यांनी घटनास्थळी हजर झाले होते.वरीष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याची कारवाई चालू असुन त्यानंतर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणी व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी यांच्या माध्यमातून पंचनामा सुरू आहे.मालाची अंदाजित रक्कम करोडोंच्या घरात सांगितली जात आहे.
Tags
news
