बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्म दिनानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न




शिरपूर : संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण भारतात १०० निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन यशस्वीपणे झाले.

शिरपूर शाखेत नियमितपणे होणाऱ्या सत्संग हॉल वरवाडे येथील शंकर पांडू माळी बहुउदेशीय हॉलची संपूर्ण आतील व बाहेरील भागाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी शिरपूर सेवादल युनिट चे ईंचार्ज जगदीश माळी, सर्व सेवादल पुरुष, महिला व बाल सेवादलांनी परिश्रम घेतले.

धुळे झोन 36-बी अंतर्गत 20 शाखांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक, सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले अशी माहिती संत निरंकारी मंडळाचे धुळे विभागीय क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील यांनी दिली.
     
हेच महाअभियान पुढे घेऊन जात असताना मिशनच्या सेवादारांकडून वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांची देखभालही करण्यात येणार आहे.
बाबाजींच्या जन्मदिनी मिशन मार्फत 2003 पासूनच स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात आले असून ते सातत्याने पुढे नेले जात आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मिशनच्या वतीने केवळ जिथे सत्संग भवन आहेत तिथे आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने