प्रतिनिधी ..महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केले जाते.त्याच बरोबरीने आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने विविध उपक्रम राबवित असतात.त्याचाच एक भाग म्हणून ' मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ' या वर्षी चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२२ धुळे जिल्हा शिरपुर तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायती च्या आदर्श सरपंच सौ उज्वला प्रतापराव पाटील यांना जाहीर झाला आहे यानी ग्रामपंचायती च्या माध्यमातून गांवात अनेक विकास कामे केली असून याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे साठी सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.त्या वाघाडी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि विधितज्ञ ॲड. प्रतापराव पाटील उर्फ बाबा पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जाते. त्याच अनुषंगाने ' मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा ' राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा -२०२२ रविवार दि.२० मार्च २०२२ दुपारी१२ वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी दिली.या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष युवा नेतृत्व रोहित संजय पवार हे राहणार असून या पुरस्काराचे वितरण आदर्शगांव पाटोदा चे लोकप्रिय सरपंच मा.भास्कर पेरे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे श्री महीला गृह उद्योग लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक मा सुरेशराव कोते संस्थापक यादवराव पावसे मा डॉ राधेश्याम गुंजाळ अध्यक्ष महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज , आदर्शगांव राळेगणसिद्धी चे सरपंच लाभेश औटी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,ग्रामसेवक संघटनेचे राज्यध्यक्ष एकनाथराव ढाकणे,हभप राजेंद्र गरूड महाराज शिरुर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,मानचिन्ह, फेटा व शाल असे राहणार आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच,उद्योग भूषण, पत्रकारिता,युवारत्न, समाजभूषण आदर्श तालाठी आदर्श ग्रामसेवक आदर्श शिक्षक
प्रशासकीय सेवा,सामाजिक,
शैक्षणिक,कोरोना योध्दा,मीडिया, कृषी,व्यापार,कला,
राजकिय,महसूल,वैद्यकीय, आध्यात्मिक
ऐतिहासिक,दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच संघटीत चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे सोशल मीडिया प्रमुख रोहीत पवार मा.सागर कासार मा महेश शिंदे मा.दिपक मनसुक मा.सौ शशिकला पवार सौ सुजाता कासार सौ सविता मनखुक मा.सागर कोल्हे मा निलेशकुमार पावसे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे
Tags
news
