बस बंद असल्यामुळे सामाजिक संघटना श्रीराम प्रतिष्ठान आले विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून; बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी



मलकापूर - उमेश इटणारे 
 बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून तरी ग्रामीण भागात बस सेवा बंदच आहे. त्यामुळे शहरासह बाहेरगावी असलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेवर कसे पोहोचावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नेहमी समाज कार्यामध्ये तत्पर असणारी श्रीराम प्रतिष्ठान यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आलेत.
   गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. तीन महिन्याच्या वर होऊ नही एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तोडगा निघत नसून 'तारीख पे तारीख' दिल्या जात आहे. अशातच चिखलीच्या विद्यमान आमदार तसेच मलकापूर येथील श्रीराम प्रतिष्ठान यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी ऑटो रिक्षा तसेच मोठे वाहन स्वखर्चाने उपलब्ध करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचवणार.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने