अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज 1 मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मुंदडा पंपाजवळ घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिले आणि पसार झाले. दुचाकीस्वार चिरडला गेल्याने त्याला ओळखता येणे अवघड झाले. त्याच्या खिशात ओळखीचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे पाठविण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत मृतकाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
Tags
news
