महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणूक 2022 रणधुमाळी, अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन चे पॅनल प्रमुख डॉ. पंकज चौधरी यांची निवडणुकीत माघार




शिरपूर -
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणूक 2022 रणधुमाळी सुरू आहे सदरील निवडणुकीत अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन चे पॅनल प्रमुख डॉ. पंकज चौधरी सर यांनी निवडणुकीत माघार घेऊन आज अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष विजय पाटील,सेंट्रल झोन औषधी विक्रेता संघाचे कार्यध्यक्ष नरेश भगत यांच्या नेतृत्वात आज कल्याण येथे आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला व महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघाच्या अंतर्गत फर्मासिस्ट प्राध्यापक संघटनेची जबाबदारी डॉ पंकज चौधरी यांच्या कडे देण्यात आली यावेळी उपस्थित नाशिक जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष अतुल अहिरे,धुळे जिल्हा औषधी विक्रेता संघाचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, सहसचिव अनिल चौधरी व फार्मसी स्तुडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भूषण भदाणे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने