शहादा (प्रतिनिधी) :- अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाने भुरळ घातली आहे. अनेकजण या पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत. तर अनेक जण पुष्पा स्टाईलने दाडीवर हात फिरवंतांना दिसत आहेत. तसेच आता शहादा - तळोदा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी हेदेखील यात कमी नाहीत. शहादा येथे एका कार्यक्रमाला जात असतांना त्यांनी पुष्पा सिनेमाचा डायलॉग म्हंटला " मै झुकेगा नही...!!" असं बोलत दाडीवर हात फिरवंतांना काढलेला व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. युवकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमदारांचा पुष्पा स्टाईलची चर्चा गावा-गावात गल्लो गल्लीत सुरू आहे.
आ. पाडवी यांनी मुंबईत असताना आई (कै.) कलावती पाडवी यांच्या नावाने फाउंडेशन स्थापन करून समाजसेवेचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले होते. कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली त्यांची समाजसेवा त्यांना आमदारकीपर्यंत घेऊन गेली. आ. पाडवी यांनी मुंबई येथील पोलीस निरीक्षकपदाची आपली २७ वर्षाची नोकरी सोडून राजकारणात आलेत म्हणून त्यांची मतदार संघात ओळख म्हणजे "सिंघम आमदार" अशी आहे. आ. पाडवी यांचा अडीच वर्षाच्या कालावधीत तळागाळातील जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत सातपुद्याच्या कानाकोपऱ्यात पायपीट करून तेथील समस्या जाणून त्यावर निवारण करीत आहेत.
"पुष्पा,... पुष्पराज,... मै झुकेगा नही" या संवादाचा सर्वत्र क्रेज सुरू आहे. हे साध्य तरुणांमध्ये फेमस आहे. त्यातच आमदारांचा व्हिडीओ पाहून तरुणांनी त्यावर प्रचंड प्रतिसाद देत आमदारांचा पुष्पा स्टाईलचा व्हिडिओ आपल्या व्हाट्सएप स्टेट्सवर ठेवला होता.
Tags
news
