वाघाडी येथे जयश्रीबेन अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिवस आनंदात साजरा
शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता. शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सीबीएसई स्कूल मध्ये दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका रथी नायर यांनी मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी सुविचार, म्हणी, छान कविता सादर केल्या. शिक्षिका सुचिता जैन यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचा समारोप संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाले. विज्ञान दिवसाची माहिती शिक्षिका शितल
बाबर यांनी दिली. विज्ञानाच्या शिक्षिका सोनाली मामिडवार व शितल बाबर यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. मुख्याध्यापिका रथी नायर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका अपर्णा मोकाशी यांनी आभार मानले.
