■■ आश्चर्य... म्हसावद येथे एकाच रात्रीत फोडली सहा दुकानी; मात्र चोरीच केली नाही..!! ◆◆ एका महिन्यापूर्वी फोडलेले दुकान परत फोडले; काय आहे या मागे गौडबंगाल..!!




शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एकाच रात्री सहा दुकाने फोडली. महिन्याभरात ही दुसरी घटना असून गेल्या महिन्यात फोडलेल्या दुकानास दुसऱ्यादा फोडण्याचा प्रयत्न केला आहे . यात पाच हजाराचा मोबाईल चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे . याबाबत म्हसावद पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
                याबाबत वृत्त असे की , शुक्रवारी रात्री म्हसावद (ता.शहादा) येथे एकाच रात्रीत सहा दुकाने फोडण्यात आली तर एका दुकानात दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . यात गुरूकृपा कृषी सेवा केंद्र या दुकानातून पाच हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरी करण्यात आला आहे . याबाबत सागर राजाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या दुकानाजवळचे महालक्ष्मी किराणा दुकान , वसंत शंकर ज्वेलर्स , कलश ज्वेलर्स , पंचकृष्ण हॉटेल , श्री . चामुंडा ट्रेडींग होलसेल किराणा ही दुकाने फोडण्यात आली . येथून एक रूपयाची चोरी झाली नाही हे विशेष , तर गेल्या महिन्यात १ जानेवारीला फोडलेले शिव ज्वेलर्स पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केला पण यश आले आहे. दुकाने फोडली पण चोरी केली नाही..!! या मागे काहीतरी गौडबंगाल आहे . एका महिन्यात दुसऱ्यांदा धाडसी दुकान फोडी झाल्यावर म्हसावद पोलीसांचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . 
              रात्रीतून पोलीस गाडीवर गस्त करताना गाडीचा सायरन वाजवत फिरतात तर चोर सापडतील का ? सायरन का वाजवावा ? केव्हा वाजवावा ? याची नियमावली पोलीसांनी जाणून घेणे महत्वाचे आहे . दहा वर्षापासून रात्रीची गस्त म्हणजे येरे माझ्या मागल्या या प्रमाणे म्हसावद पोलीसांचे सुरू आहे . रात्रीतून गस्त घालताना सायरन वाजवणे कितपत योग्य आहे ? सहा दुकाने फोडली पण चोरीच झाली नाही हा पण आश्चर्याचा भाग आहे . यामुळे एकानेच चोरीची फिर्याद दिली आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने