थाळनेरला शॉर्ट सर्किटमुळे 30 एकर ऊस जळून खाक नुकसान भरपाई ची शेतकऱ्यांची मागणी थाळनेर( प्रतिनिधी)



शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतातील मुख्य विद्युत वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन 30 एकर ऊस जळून खाक झाला. तरुणांनी वेळेच मदत केल्यामुळे ७ एकर ऊस वाचविण्यात यश आले.
 या बाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील चुनीलाल जमादार यांच्या उसाच्या शेतातून महावितरणची 11KW मुख्य लाइन गेली आहे. या ठिकाणी मुख्य वाहिनीच्या तार लोंबकळत होते. याबाबत शेतकऱ्याने महावितरणला तोंडी कळवले होते. महावितरणचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन पाहणीही करून गेले होते. महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे आज दिनांक२६/२/२२रोजी दुपारी२ ते 2.30 वाजेच्या सुमारास अचानक शार्ट सर्किट होऊन चुनीलाल जमादार (३ll) भोजुसिंग भिमसिंग जमादार( २०)मोहन सिंग सरदारसिंग गिरासे(2ll) रवींद्र मगन सिंग जमादार (४)यांचा ऊस जळून खाक झाला. जमादार पाडा येथील तरुणांनी प्रसंगावधान राखत वेळीच मिळेल त्या वस्तूने मदत केल्यामुळे पुढील आठ दहा एकर ऊस वाचविण्यात यश आले. यावेळी तेजस जमादार , करतार जमादार, हरपाल जमादार, प्रवीण जमादार ,प्रदीप राउळ, भागवत तेले ,दीपक जमादार, कुलदीप जमादारआदींनी मदत केली.
 शिरपूर अग्निशामक दलाचा बंब याठिकाणी आला परंतु शेतात न टाकल्यामुळे त्याचा काहीच उपयोग झाला नाही.API उमेश बोरसे यांनी शेतात येऊन लगेच पाहणी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने