धनुर- प्रतिनिधी -ग्रामीण भागात काम करणाऱा पोलीस पाटील हा शेवटच्या घटकातील पोलीस प्रशासनाचा महत्त्वाचा कणा आहे, त्यामुळे कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात काम न करता निरपेक्ष काम करावे.असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात केले .
धुळे तालुक्यातील सोनगीर येथे केशरानंंद भुवन येथे सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांनी १७ डिसेंबर रोजी पोलीस पाटील दिनानिमित्त स्नेहमेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील ,तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे ,धुळे जिल्हा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष छोटुलाल पाटील ,जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे, नंदुरबार अध्यक्ष ॶॅड दिपमाला पाटील,पाटील धुळे जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरण देवरे, धुळे तालुका महीलाध्यक्ष भारती अहिरे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रविण दादा पाटील,धरणगाव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे,कार्याध्यक्ष महेंद्र पाटील, साक्री तालुका अध्यक्ष रवींद्र बेडसे, उपाध्यक्ष आनंदा पाटील ,शिंदखेडा तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष नारायण गिरासे ,शिरपूर तालुका अध्यक्ष राजु सातकर, शिंदखेडा माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, युवराज माळी, आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले की पोलीस पाटील हे अँनराॅइड जगात असल्यामुळे जलदगतीने माहिती पोहचवण्यास पोलीस
प्रशासनाला खूप मदत होते.कोरोना काळात पोलीस पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.पोलीस पाटलांच्या अडचणींबाबत मी लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली ,सुरुवातीला कोरोना महामारीचा सामना करतांना मयत झालेले पोलीस ,पोलीस पाटील , आरोग्य कर्मचारी तसेच सर्पदंशाने मयत झालेले पाटणचे (शिंदखेडा)पोलीस पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत निकुंभे गावाचे पोलीस पाटील चंद्रसेन पानपाटील यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे गावातील सोनगीर ग्रामीण रुग्णालय, कापडणे ,मुकटी ,बोरीस, लामकानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात लसीकरणावर भर दिला त्यामुळे पोलीस पाटील संघाकडून उपस्थितांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सुकवड प्र.,डांगरी मोहाडी प्र डांगरी, तामसवाडी, दापुरा दापोरी, चिंचवार येथील पोलीस पाटलांना देखील सन्मानपत्र देवुन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील नितीन महाले सूत्रसंचालन संदेश पाटील तर आभार अतुल भामरे यांनी मानले.
Tags
news
