भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार...! मुंबई-दादर-प्रतिनिधी




भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार...!

मुंबई-दादर-प्रतिनिधी
जागतिक टपाल दिन ( 'वल्ड पोस्ट डे' ) हा जगभरातून साजरा केला जात आहे. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा लाभ घेतात. ही सेवा फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो..महत्वाचं आणि स्वस्त साधन म्हणजे पोस्ट सेवा.
भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) दिनांक ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार असून याच जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP)  टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि
विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.. मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२० हा किताब पटकावणाऱ्या सिद्धी कामथ यांनी इरादा आणि जग्गा जासूस या हिंदी सिनेमातून आणि वृत्ती, सांगा बाजीराव, गावाला गोत्यात पंधरा लाख खात्यात या मराठी सिनेमातून आपली अभिनय कारकीर्द सुरू केली. त्याचबरोबर लाडाची मैना ,सेकंड हॅन्ड आणि अनंतकोटी या नाटकांत देखील त्यांनी कामं केली आहेत. नाट्याभिनय बरोबर त्यांनी
काही निवडक हिंदी-मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची ठसा उमटविला आहे. दिया और बाती , क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेत तर लक्ष ,नांदा सौख्यभरे, क्राइम टाइम, प्रेमा तुझा रंग कसा, हास्यरंग, ये फसा, गजरा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, फुलाला सुगंध मातीचा, क्रिमिनल या मराठी मालिकांत त्यांनी विविधरुपी भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं यां लोकप्रिय मालिकेतील लक्ष्मीची सासू ही व्यक्तिरेखा विशेष गाजली. सिद्धी कामथ यांनी अभिनयाबरोबर समाजसेवेची आवड सुद्धा जोपासली आहे. त्याचे फलित म्हणुन त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तक्रार निवारण प्रमुख पदी, भारतीय महाक्रांती सेनाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणुन आपली धुरा सांभाळत आहेत. त्यांना आतापर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार  २०२०, समाज गौरव पुरस्कार २०२०, आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१, समाज भूषण पुरस्कार २०२१ आणि आंतरराष्ट्रीय मानवता अवॉर्ड २०२१ असे अनेकविध पुरस्कार मिळाले. त्यांच्या सामाजिक अशा उल्लेखनीय कार्याचा उचीत गौरव म्हणुन भारतीय टपाल विभाग दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे त्यांचा त्यांच्याच छायाचित्राचे टपाल तिकीट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल मुंबई महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने