आता उदंड जाहले पुरस्कार शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे




पुरस्कार म्हणजे एखाद्याने केलेल्या  चागल्या कामाचे  कौतुक, त्याच्या  पाठीवर दिलेली शाबासकीची थाप असते. पण सध्या अशा प्रकारचे आदर्श  पुरस्कार वाटणा-यांची  खूप मोठी  संख्या राज्यभरात दिसत आहेत. सध्या सर्वत्र पुरस्काराचे पेव फुटलेले  दिसते.एखादी ट्रस्ट, मंडल,संस्था अशा प्रकारचे आदर्श  शिक्षक पुरस्कार, आदर्श समाज सेवक पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, ई.पुरस्कार वाटप करतांना दिसत आहेत. ह्याच्यात अजून  राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार वाटप केले जातात. तशा काही  ट्रस्ट, संस्था ह्याला अपवाद आहेत. ते निशुल्क  आणी  केलेल्या  कामाचे  योग्य  मुल्यामापण करून  पुरस्कार देतात. 
पुरस्कार वाटणा-या ह्या संस्था पुरस्कारासाठी  शुल्क आकारतात. पण ज्याला  पुरस्कार  द्यायचा आहे  तो त्या  पात्रतेच्या  आहे की नाही  हे पाहीले जात नाही.कोणीही ऊठसूट पुरस्कार वाटतांना   दिसत आहेत. काही ट्रस्टनी तर हा  व्यवसायच करून  घेतला आहे.ह्याच्यामुळे जे क्रियाशील असतात  ते पुरस्कारांपासून वंचित राहतात. आणी पैसे देऊन   काही  निष्क्रिय लोकं पुरस्कार  विकत  घेतात. आणी  स्वतःला आदर्श म्हणवून  घेतात. 


भाकरी राहील्या कच्या 
तवा खेला भाजून 
नायक राहिले  बाजूला 
आणी  खलनायक राहिले गाजून

पुरस्कार देणा-यांची आणि पुरस्कार घेणा-यांची संख्या खूप मोठी आहे.म्हणून तो पुरस्कार आदर्श कितपत असेल  हाही एक मोठा प्रश्नच आहे.शासनाकडे पणे पुरस्कार देण्याचे  चांगले  नियोजन दिसत  नाही.शासन ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्यांच्याकडून प्रस्ताव मागवते  तुम्ही  चांगले काम केले आहे म्हणून. पुरस्कार घेणारा पण स्वतःचे कौतुकाचे पुरावे जोडून मी कसा आदर्श आहे हे दाखवण्याच्या प्रयत्न करतो.शासनाची प्रस्ताव मागविण्याची पद्धत योग्य वाटत नाही.योग्य व्यक्तीस आदर्श पुरस्कार खरोखर प्रामाणिकपणे द्यायचा असेल तर शासनाने  तटस्थ  व गुप्त पणे समिती नेमून   त्या समितीने कोण आदर्श  किवा  पुरस्कारास  पात्र आहे  हे निरीक्षण करुन  शासनास कळवावयास हवे.तेव्हा योग्य आणी  प्रामाणिक पणे  पुरस्कार  दिले जातील. तरच आदर्श शब्दाला अर्थ उरेल पण,सर्वच ठिकाणी ओळख, वसिला, पैसा  यांच्या  वापर  होताना  दिसतो.


"आदर्श "नसले तरी चालेल पण माणसाने हुशार असले  पाहिजे

पुरस्कार घेण्यासाठी आदर्श असलेच पाहिजे अस काही नाही पण माणसाने  हुशार असले पाहिजे.
40 वर्षा पुर्वीची एक गोष्ट आहे.एका  जि.प.शाळेत एक शिक्षक वर्गात आला वर्गात लहान मुले बसलेली  होती.वर्गात एक लांब टेबल व एक खुर्ची होती.त्या काळी  शिक्षणाच्या जास्त  सुविधा  नव्हत्या.शै.साधणे पण  नव्हती.मुलांना अभ्यास सांगून त्या  शिक्षकाने वर्गात आपले  शर्ट काढले. उघडाबंब  झाला ,आणी  टेबलावरच झोपला.तो घोरायला लागला.पण त्याच  दिवशी शाळेला  भेट  देण्यासाठी गट शिक्षण अधिकारी,विस्तार अधिकारी  ,सरपंच, आणखी ईतर लोक सोबत होते. ते शाळेला भेट देण्यासाठी निघाले. थोडा गर्दीच्या गोंधळ झाला म्हणून  याला  जाग आली .याने दुरूनच त्यांना खिडकीतून पाहून घेतले.आणी तो स्वतःलाच म्हणाला आता माझी  नोकरी गेली.पण तो  हुशार होता.त्याने  जे होईल ते.त्याने  अधिकाऱ्यांकडे लक्ष  दिले नाही. तो झोपूनच शिकवायला लागला. ते अधिकारी  वर्गात येवून मागे उभे  होते.ह्याने मुलांना झोपलेल्या अवस्थेत शरीराला हात लावून सांगितले  मुलांनो,ह्यांना  बरगळ्या म्हणतात, ह्याला पोट म्हणतात, इथे हृदय असते वैगरे ई.ते अधिकारी गम्मत बघत होते.त्यांना आश्चर्य वाटले  थोड्या  वेळात  त्यांनी त्या  गुरुजींना  विचारले.गुरूजी,हे काय  करत आहेत. त्यांना पाहून  आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत सांगतो,साहेब, शै.साहित्य  नसल्यामुळे मी  त्यांना  प्रत्यक्ष  शिक्षण देत आहे.साहेब  खुश झाले.ईतके चांगले शिक्षक आहेत  म्हणून साहेबांनी त्यांची  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन पाठवले.
म्हणून पुरस्कार  घेण्यासाठी आदर्श असलेच पाहिजे अस काही नाही पण माणसाने  हुशार  निश्चित असले पाहिजे

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने