लखीमपुर-खीरी घटनेचे पडसाद महाराष्ट्रात ११ ऑक्टोंबर रोजी शिरपूर बंद चे आवाहन



शिरपूर प्रतिनिधी /= उत्तर प्रदेशातील लखमीपूर खिरी येथे काळ्या कृषी कायद्याविरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने  गाडी घालून पाच जणांना चिरडले. मात्र त्याला अटक करणे दूरच, उलट सरकारी संरक्षण पुरवले जात आहे. दिल्ली येथे तेरा महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यास पंतप्रधान तयार नाहीत. पेट्रोल-डिझेल-स्वयंपाकाचा गॅस दरवाढ, महागाई यामुळे सामान्य माणसाचे, व्यापाऱ्यांचे, उद्योजकांचे, शेतकऱ्यांचे आणि प्रत्येक समाज घटकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्याला सातत्याने लक्ष्य करणे, राज्याची व राज्यातील नेत्यांची बदनामी व्हावी याहेतूने कट कारस्थाने केली जात आहेत. याविरोधात महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीने *सोमवारी, दि.11 ऑक्टोबर 2021 रोजी* बंद पुकारण्यात येत आहे. शिरपूर शहर आणि तालुक्यातील तमाम व्यावसायिक, दुकानदार यांनी आपापले व्यवहार बंद ठेऊन शिरपूर बंद यशस्वी करावा असे आवाहन करीत आहोत. 


बंदची रूपरेषा : 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता महाविकास आघाडी व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिरपूर बसस्थानकावर एकत्र जमतील.
तेथून मेन रोडने चालून जात बंदचे आवाहन करीत प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहचतील. संयुक्त शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. तरी व्यापारी बांधवांनी एक दिवस बळीराजा साठी शिरपूर बंद करून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनासाठी उतरावे असे आव्हान महा विकास आघाडीचे राष्ट्रवाद काँग्रेस पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिवसेना,प्रहार जनशक्ती पक्ष
मानव एकता पार्टी,किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी विकास फाउंडेशन ,सत्यशोधक संघटना, धुळे जिल्हा जागरण मंच, संभाजी ब्रिगेड, तालुक्यातील व शहरातील शेतकरी बंधू, बिरसा फायटर्स, बीरसा ब्रिगेड व सहयोगी संघटना.आदींनी केले आहे


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने