शिरपूर तालुका पोलिसांची पुन्हा एकदा गांजा शेती वर कारवाई



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात अवैधपणे गांजा लागवड करणाऱ्या लोकांच्या विरोधात शहर व तालुका पोलिसांनी धडक मोहीम उभारली असून पोलिसांकडून वारंवार गांजा शेती वर कारवाई होत आहे 
अशीच कारवाई काल दिनांक 10 ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेला गोपनीय माहितीच्या आधारे एक पथक तयार करून छापा टाकला असता गांजा शेती वर कारवाई करण्यात आली आहे.
 याबाबत गोपनीय बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या  माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मालकातर गावाच्या शिवारात विकला पाडा येथे इसम नामे फुलसिंग तिरंग्या पावरा याने आपल्या वनजमिनीचे शेतात गांजा सदृश्य अमली पदार्थांचे झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याची बातमी प्राप्त झाली होती.
 सदर माहितीच्या आधारे एक पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 60 हजार 800 रुपये किमतीचे 30 किलोग्राम वजनाचे गांजा सदृश अमली पदार्थांचे हिरवी झाडे पाने व फांद्या मुलांसह तीन ते पाच फुटापर्यंत ची रोपे असा अंदाजित प्रति किलो 2000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, पीएसआय भिकाजी पाटील ,नरेंद्र खैरनार व पोलीस कर्मचारी हेमंत फुलपगारे, लक्ष्मण गवळी, प्रेमसिंग गिरासे, मोरे ,आरिफ पठाण ,नेरकर ,अश्विनी चौधरी, संतोष पाटील, इसरार इत्यादींच्या पथकाने केली असून याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कलम कायदा 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय नरेंद्र खैरनार करत आहेत.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने