दोडाईचा येथे प्रताप राँयल्स इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये *राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)
 दिनांक 2ऑक्टोबर रोजी प्रताप रॉयल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,दोंडाईचा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी, शाळेचे  
चेरमन सौ चंद्रकला सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले तसेच सौ चंद्रकला सिसोदिया यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले तसेच
प्राचार्य श्री. पराग पोळ यांच्या अध्यक्षतेखाली  व  माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन  , पर्यवेक्षक श्री.ललित कुवर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्री. पराग पोळ,श्री. विनोद गीते  व  श्री. ललित कुवर यांनी मनोगत व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने