रोटरी सिनियर्स दोंडाईचाला कोविडकाळात उत्कृष्ट कामांचा सर्वोच्च प्लँटीनम कल्बचा सन्मान
दोंडाईचा ( अख्तर शाह)
जगभरातील सामाजिक सेवेतील अग्रगण्य संस्था रोटरी इंटरनँशनल दरवर्षी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वार्षीक पारितोषिक वितरणाचा सोहळा आयोजित करीत विविध क्लबच्या केलेल्या कामाचा आढावा घेऊन सन्मानित करीत असते . संपुर्ण गुजरात व महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा एकत्रीत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६०चा बक्षीस वितरण सोहळा दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या सिल्वासा येथे ट्रिट रिसार्ट ह्या नयनरम्य स्थळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.प्रशांत जानी , हिता जानी , रो. संतोष प्रधान ,रो.श्रीकांत इंदाणी , रो.निहीर दवे इ.अनेक मान्यवराच्यां उपस्थितीत दि.१७ आँक्टोबर रविवार रोजी संपन्न झाला .
रोटरी ३०६० डिस्ट्रिक्टमध्ये एकुण ११२ क्लब असुन ८७१७ सदस्य आहेत त्यात विविध क्लबच्या अध्यक्ष व पदाधिकारींना गौरविण्यात आले .रोटरी सिनायर्स दोंडाईचाच्या माध्यमातून कोविडच्या काळात संकटाचे संधीत रुपांतरीत करीत दोंडाईचा शहर व परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे ४० रुग्णांसाठी दोंडाईचा सोशल ग्रुपमधिल दानशुर सदस्यांच्या मदतीने सेंट्रल आँक्सिजन सिस्टीम बसवुन दररोज आवश्यक सिलेंडरचा पुरवठा ,रुग्णांसाठी लोखंडी बेड ,गाद्या , आँक्सिजन फ्लो मिटर इ पुरवीण्यात आले तसेच वर्षभरात रक्तदान शिबिरे ,अन्नदान , सार्वजनिक ठिकाणी सँनीटायझर व मास्क वाटप करण्यात आले अशा प्रकारे कोविडकाळात सर्वोत्कृष्ट काम केल्यामुळे रोटरी डिस्ट्रिक्ट तर्फे सर्वोच्च सर्वीस प्रोजेक्ट प्लँटीनम अवार्ड , रक्तसंकलन अवार्ड , अन्नपूर्णा अवार्ड , सर्वाधिक आरोग्य शिबिरे ,अँक्टीव्ह प्रेसिडेंट , अँक्टीव्ह क्लब इ अनेक सन्मानाने अध्यक्ष चेतन सिसोदिया , डॉ राजेंद्र पाटील ,सौरव अग्रवाल , डॉ अनिल धनगर ,अमन जयस्वाल , डॉ गणेश खैरनार , राजेंद्र परदेसी ,प्रविण महाजन इ सदस्यांना एकुण ११ अवार्ड देऊन गौरवण्यात आले .
रोटरी सिनियर्सचा हा सन्मान कोविडकाळातील सर्वोत्कृष्ट काम केल्यामुळे झाला परंतु रोटरीसोबत सर्वोत्कृष्ट काम करणारे व सेंट्रल आँक्सिजन सिस्टीमसाठी मदतीचा हात पुढे करणारे सर्व दानशूर व्यक्ती , उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी , नगरपलीकेचे सर्व अधिकारी , स्वच्छता कर्मचारी ,पोलीस तसेच महसुल विभागाचे कर्मचारी यांना समर्पित करीत आहे .
Tags
news
