शिरपूर तालुक्यातील हिंगोणी बु गावात 100 टक्के लसीकरण तालुक्यातील कोरोना मुक्त गाव


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील हिंगोली बु. गावात नागरिकांचे 100% लसीकरण पूर्ण करण्यात आले असून तालुक्यातील हिंगणे बुद्रुक गाव आहे कोरोना मुक्त गाव म्हणून समोर आले आहे. या गावातील नागरिकांचे कोव्हीशिल्ड लसिकरण चे १००% लसिकरण यशस्वी करण्यात आले आहे याबाबत गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकार्‍यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

वाडी PHC अंतर्गत येणाऱ्या हिंगोणी बु गावात सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या कडुन मिळालेले वेळोवेळी लसिकरणांबद्दल सहकार्य व प्रबोधन मिळाल्यामुळे  हिंगोणी बु गाव हे आज दि 8/10/2021 रोजी 7 वा कॅम्प घेवुन 100% लसिकरण व कोरोणामुक्त गाव झाले म्हणून गावकरी व ग्रामस्थ यांनी आभार प्रदर्शन केले आहे.
अशी माहिती हिंगोली बुद्रुक गावाचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील यांनी दिली आहे.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने