दोंडाईचा येथील इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने देशातील पहिले इंजिनियर एम. विश्वेश्वराय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर इंजीनियर्स डे साजरा करण्यात आला




दोडाईचा (अख्तर शाह)
या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व कोरोना काळात सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान व मोकळ्या जागेत वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले होते .



 कार्यक्रम सुवर्णकार भवन येथे घेण्यात आला यावेळी  दोंडाईचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉ प्रवीण निकम  याप्रसंगी व्यासपीठावर बांधकाम सभापती निखिल राजपूत ,नगरसेवक  जितेंद्र गिरासे सर, इंजीनियर असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी ,उपाध्यक्ष गुलाम रसूल एम शेख,  जी.आर पाटील, सचिव जगदीश गोराणे , आदी मान्यवर उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट केल्याबद्दल लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड सीनियर इंजिनिअर्स जी आर पाटील व गुलाब नबी शेख यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देण्यात आला. याप्रसंगी बोलताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणाले ,आपल्या देशातील पायाभूत सुविधा व तांत्रिक दृष्ट्या विकास हा फक्त इंजिनियर यांच्या माध्यमातून झालेला आहे. योजना सफल आणि यशस्वी होण्यासाठी इंजिनियर बांधवांचा मोलाचा वाटा आहे .शहर विकासाचा आराखडा मजबूत होण्यासाठी इंजीनियर्स बांधवांकडून दर्जेदार कामाची अपेक्षा आहे .याप्रसंगी हिमांशु जी शहा ,नगरसेवक प्रतिनिधी जितेंद्र गिरासे सर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . याच कार्यक्रमात कोरोना काळात मृत पावलेल्या लोकांची दफनविधी व अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे विलास पाटील, दिनेश पारधी, संतोष पाटील .इरफान शेख  यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला . 


यावेळी उपस्थित
इं संजय चौधरीइं  गुलाम शेख इं गणेश गोराणे. इं हिमांशू जी शहा . इं केवलसिंग पाटील. आर्किटेक कैलास जैन. इं चंद्रसिंग सिसोदिया. इं आरिफ खान आर्कि. जयश्री सोमवंशी. इं अजय पटेल इं नूर जमाल इं वसीम  एम मन्यार. इं शुभम रामोळे. इं राजकुमार तायडे. इं जयदीप सी जाधव. इं शशिकांत शिंदे. इं मतीन मनियार. इं प्रतीक मलके. इं महेंद्र पवार. इं महेंद्र गिरासे कॉन्ट्रॅक्टर मुनाफ .शेख आमीन. शेख मोहम्मद हनिफ शेख.
यावेळी शहरातील अभियंता व स्थापत्य अभियंता तसेच कॉन्ट्रॅक्टर आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनीयर चंद्रकांत सिसोदिया व गुलाम रसूल शेख यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंजिनीयर शशिकांत शिंदे .सह सर्वांनी परिश्रम घेतले
.
आभार आर्किटेक जयश्री सोमवंशी यांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने