शिरपूर - रात्रीच्या सुमारास सार्वजनिक शौचालय शेजारी तथा रस्त्यावर पत्ते खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील किस्मत नगर मध्ये गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी समदअली सय्यदअली 40 किस्मत नगर शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून रात्रीच्या सुमारास किस्मत नगर मधील सार्वजनिक शौचालय शेजारी मोकळ्या रस्त्यावर गुरुवारी 23 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास काही जण पत्ते खेळत असताना त्यांना खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून कदर अहमद पिंजारी रा.किस्मत नगर याने हातात वीट घेऊन छातीवर, पाठीवर,पोटावर, तोंडावर,मारहाण करीत गुप्ती आणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना नारायण मालचे करीत आहेत.
Tags
news


