शिरपूर प्रतिनिधी -शिरपूर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी शिरपूर व आरोग्य अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे
केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्य शासनाच्या संबंधित योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत देशपातळीवर संपाची घोषणा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या आवाहनानुसार सदरचे आंदोलन करण्यात आले आहे यात महाराष्ट्रातील आशा सेविकांना दरमहा 2 हजार रुपये व गटप्रवर्तक यांना दरमहा 3 हजार रुपये मानधनाची मागणी करण्यात आली असून अद्याप पर्यंत हा लाभ मिळालेला नाही व इतर 78 कामांचा मोबदला देखील आज पर्यंत देण्यात आला नाही. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अशा महिलांना एक हजार रुपये मानधन व वाढ 500 रुपये प्रोत्साहन भत्ता व गटप्रवर्तक यांना 1200 रुपये मानधन व 500 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही मागील दीड वर्षाच्या कोरांना काळात अशा प्रवर्तक आशा व गटप्रवर्तक यांनी दररोज 8 तासांपेक्षा अधिक काम करून शासनाची विविध नेमून दिलेली कामे केली आहेत मात्र तरीदेखील मिळणाऱ्या शासकीय लाभापासून आशा व गटप्रवर्तक महिलांचे कुटुंब वंचित आहे त्यामुळे कामाचा मोबदला न मिळणे व थकीत वेतन यामुळे आशा व गटप्रवर्तक महिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून संघटनेने मानधन मिळावे कामाचा मोबदला मिळावा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम करताना प्रत्येक केस साठी 200 रुपयांच्या मानधन मिळावा , प्रोत्साहन भत्ता मिळावा ,विविध शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे ,आरोग्य सेविका भरती मध्ये 50 टक्क्यांची आरक्षण मिळावे, कामे करताना आवश्यक ते साधन सामग्री मिळावे, इत्यादी मागण्यांसाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे या मागणीचा गांभीर्याने विचार करून तर तात्काळ शासनाने पाठपुरावा करावा अन्यथा आशा व गटप्रवर्तक संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे .सदरचे आंदोलनाला तालुक्यातील किसान संघटनांनी पाठिंबा दिला असून यावेळेस शेकडो आशा व गटप्रवर्तक महिला कार्यकर्त्यांसोबत एडवोकेट हिरालाल परदेशी, डॉक्टर किशोर सूर्यवंशी ,एडवोकेट संतोष पाटील, अडवोकेट मदन परदेशी , अरुणा लोटन देवरे , आशा मैराळे, छाया चव्हाण, आशा वळवी, प्रतिभा पाटील, पुष्पा महाजन, स्मिता दोरीक, मालती इंगळे इत्यादी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news
