मुकटी वि.का.से.सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शरद साळुंके तर व्हा.चेअरमन पदी विमलबाई सैंदाणे



मुकटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवड नुकतीच संपन्न झाली.यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे विश्वासू समर्थक तथा मा.सरपंच शरद भगवान साळुंके यांची चेअरमन पदी तर व्हा.चेअरमन पदी सौ.विमलबाई चिंधा सैंदाणे यांची निवड करण्यात आली,वि.का.से.स.सोसायटीत सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही निवडप्रक्रिया पार पडली.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन शरद साळुंके व व्हा.चेअरमन सौ. विमलबाई सैंदाणे यांचे धुळे ग्रामीणचे आमदार बाबासो. कुणाल पाटील यांनी स्वागत केले, यावेळी  संचालक गुलाबराव पाटील,रोहिदास पाटील,उत्तम पाटील,धर्मा पाटील,अनिल पाटील,ब्रिजलाल लोहार,रघुनाथ पाटील,विनायक मराठे,डॉ.राहुल कुवर,उमाकांत पाटील,कैलास पाटील,सुमनबाई पाटील,सतिष पाटील,संतोष गायकवाड, लिपिक नरेंद्र सैंदाणे, हरिष सोनार,चिंधा पाटील,यांच्यासह गावातील शेतकरी,विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अभिनंदन करण्यात आले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने