प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : पुणे-मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही अतिशय साधेपणाने साजरा होत आहे.
त्याचा मोठा फटका नारळ विक्रीला बसला असून उत्सव काळातील नारळी विक्रीची उलाढाल २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे.
गणेशोत्सवात नारळाची सर्वाधिक विक्री पुणे आणि मुंबईत होते.
दरवर्षी उभारल्या जाणाऱ्या उत्सव मंडपांच्या परिसरात नारळाचे तोरण विक्रेते तात्पुरत्या स्वरूपात दुकाने थाटतात.
यंदा मात्र, रस्त्यावर दुकाने थाटण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
करोना संसर्गामुळे भाविकांना यंदाही लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे.
मंदिरे बंद असल्याने भाविकांना तोरणही अर्पण करता येत नाही.
त्यामुळे नारळ विक्रीत मोठी घट झाली आहे,
अशी माहिती मार्केटयार्डातील भुसार बाजारातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.
तोरणासाठी विक्रेते नवा नारळ वापरतात.
नवा नारळ कोवळा असतो.
नारळाची आवक तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून होते.
नारळाच्या सापसोल, मद्रास, पालकोल या प्रमुख जाती आहेत.
कर्नाटकातील सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळाला उपाहारगृहचालक आणि खाणावळ चालकांकडून मागणी असते.
आंध्रप्रदेशातील पालकोल नारळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते.
सापसोल, मद्रास आणि पालकोल जातीच्या नारळाचे खोबरे जाड आणि चवीला गोड असते.
श्रावण महिन्यानंतर नारळाच्या मागणीत वाढ होते.
दिवाळीपर्यंत नारळांना चांगली मागणी असते.
उलाढालीवर परिणाम : करोनापूर्वी गणेशोत्सवात राज्यभरात साधारणपणे ८० ते ९० लाख नारळांची विक्री व्हायची.
प्रमुख मंडळे आणि देवस्थानांना तोरण अर्पण केल्यानंतर पुन्हा नारळ बाजारात विक्रीस पाठविले जायचे.
तोरणाचे नारळ कमी दरात पुन्हा तोरण विक्रेत्यांना विकले जायचे.
गेल्या दोन वर्षांपासून नारळ
विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे.
Tags
news
