शिंदखेडा तालुक्यातील भांडण येथे आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भडंणेयेथील प्रगतशील शेतकरी पोपट सिताराम माळी यांचे गावा लागूनच शेत आहे या शेतात खळवाडी असल्याकारणाने तिथे आपल्या खड्यात शंभर ते दीडशे क्विंटल अंदाजीत मका कणीस गोळा केला होता त्या शेतात गहू कापणी झाली होती मात्र त्या शेतावरून महावितरण वीज कंपनीचे तारगेल्या कारणाने तिथे वाऱ्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याने गव्हाच्या शेताला आग लागल्याने तिथे मक्का ची गंजी जवळ असल्याने या गंजीला आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण माका ची गंजी जळून खाक झाली गाव जवळ असल्याने गावात आगीच्या बातमी कळताच ग्रामस्थ व शेतमालक पोपट सिताराम माळी यांनी शेताकडे धाव घेऊन भडणेयेथील पोलिस पाटील युवराज माळी यांना कळविलेयाबाबत पोलिस पाटलांनी तलाठी किशोर बडगुजर कृषी सहाय्यक भरत अहिरराव पोलिस स्टेशन व महावितरण कंपनीचे चेतन पाटील यांना या घटनेची माहिती दिली याबाबत माहिती देऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली गावातील पाण्याचे टॅंकर बोलून आग आटोक्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र आगीत संपूर्ण मका जळून खाक झाल्याने शेतकरी आपल्या डोळ्यास समोर कमवलेले पिक आगीत खाक झाल्याने रडू कोसळत होते आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेकारण गाव जवळच असल्याने आग आटोक्यात लवकर आलियावेळी माजी उपसरपंच सतीश माळी दूध संघाचे संचालक आनंदा देसले माजी चेअरमन मनोहर पाटील अशोक वाघ माजी सरपंच दत्तात्रय बागूल मुरलीधर माळी योगेश पाटील कांतीलाल लोहार जितेंद्र राजपूत आदींनी आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले
Tags
news
