इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे शेतकऱ्यांमुळे चिंकाराच्या पाडसाला जीवदान..



प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी (पारेकर वस्ती) येथील शेतकरी सुखदेव पारेकर यांना आपल्या शेतात सापडलेल्या चिंकारा जातीच्या हरिणाच्या पाडसाला वनधिकार्‍यांच्या स्वाधीन करून दिले जीवदान.

पारेकर वस्ती येथील सुखदेव पांडुरंग पारेकर आज सकाळी आपल्या घराशेजारील शेतात गेले असता त्यांना चिंकारा जातीच्या हरिणाचे पाडस आढळून आले. पारेकर यांनी लगेच इंदापूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून याची माहिती दिली. वनअधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले.

यावेळी वनविभागाचे वनरक्षक संतोष गीते यांनी त्या चिंकारा जातीच्या हरिणाच्या पाडसाचे निरीक्षण करून ते पाडस नर या जातीचे असून अंदाजे ४० दिवसांचे असून ते अशक्त  असल्याचे समजतात त्यांनी प्राथमिक उपचारासाठी त्या पाडसाला इंदापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले आहे

यावेळी वनरक्षक संतोष गीते, वनकर्मचारी बाळासाहेब वाघमोडे, निखिल जगताप आदी वन कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने