Breaking News महाराष्ट्र लॉक डाऊन चे मुख्यमंत्र्यांचे संकेत, लॉक डाऊन ची तयारी करण्याचे प्रशासनाला आदेश




मुंबई - मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण बंदी घालीव तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येने निर्बंध पाळत नसतील तर लाॅकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताहेत. त्यापार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित टास्कफोर्सची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत.
करोनाचे निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लाॅकडाऊन लावू संसर्ग थोपवावा या विषयावर बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डाॅक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रात पुन्हा लॉक  डाऊन  लावण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त झाले असून येत्या काही दिवसात याबाबतच्या निर्णय होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने