शिरपूर प्रतिनिधी - कोविड पेंशट च्या HRCT चाचणी साठी लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत अव्वा च्या सव्वा बिल आकारून कोणतीही पावती न देता अतिरिक्त रक्कम वसुली करणाऱ्या सिटी स्कॅन सेंटर छापा टाकून कारवाई करणे बाबत दिनांक 30 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून मा श्री प्रांताधिकारी साहेब शिरपूर यांना निवेदन देण्यात आले.
कोविड 19 यामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे पुन्हा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यात अनेकांना लक्षणे जाणवल्यास hrct सिटी स्कॅन करणे आवश्यक असते यामुळे त्यांचा किती प्रमाणात त्रास आहे हे समझण्यास वैद्यकीय अधिकारी यांना समझण्यास सोप्पे जात असते .त्यामुळे कोरोना चाचणी बरोबर hrct चाचणी करणे ही आवश्यक झाले आहे व या चाचणी साठी जनतेकडून अव्वा च्या सव्वा रक्कम घेण्याचे प्रकार वाढत आहे . शहरात सदरची चाचणी करण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जात असून काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा दर आकारून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे शिवाय अनेकांना कोणतेही बिल अथवा अधिकृत पावती न देता परस्पर रक्कम उकळली जात आहे सदरचा प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा असून अशा बेजबाबदार सेंटर्सवर कारवाईची आवश्यकता आहे.
वाढत्या कोरोनाचे प्रमाण बघता लॉकडाऊन लावण्यात येत आहे यामुळे अनेक हाथ मजूर गोरगरीब जनतेला खूप आर्थिक नुकसान होत आहे. आधीच मागच्या वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तसेच यंदा ही तेच सावट जाणवत आहे त्यामुळे आर्थिक चणचण असतांना HRCT टेस्ट करणे परवडत नाही त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे .
महाराष्ट्र शासनाने HRCT साठी शुल्क ठरवून दिलेले आहे असे असताना सुद्धा याचे उल्लंघन सर्रास पणे चालू आहे राजरोस पणे जनतेची लुबाडणूक होत आहे जर शासनाचे आदेशाचे उल्लंघन होऊन बेकायदेशीर पणे हि वसुली चालू आहे याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे विनंती करण्यात आली आहे की शासनाचा आदेश उल्लंघन करून अतिरिक्त वसुली करणाऱ्या hrct सेंटर वर कारवाई करावी अन्यथा मनसे तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत, मनसे शिरपूर शहर सरचिटणीस मनोज चव्हाण, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे शिरपूर शहराध्यक्ष सोनू राजपूत, मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे शहर उपाध्यक्ष अतुल बडगुजर, मनविसे शिरपूर शहर सहसचिव शोएब खाटीक, व आदी उपस्थित होते.
Tags
news
