⭕वरिष्ठाच्या छळाला कंटाळून महिला वनाधिकाऱ्याची आत्महत्या !



 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठाच्या अतोनात छळाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप होत आहे.
याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी  नागपुरातून नाट्यमयरीत्या अटक केली. 
दरम्यान, जोपर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, 
अशी भूमिका घेत दीपाली चव्हाण यांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 
या घटनेच्या निमित्ताने भा.ज.पा.ने ठाकरे सरकारला लक्ष्य केले. 
आत्महत्येच्या या घटनेचे संतप्त पडसाद आज जिल्ह्यासह राज्यभरात उमटले.
 उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी मृत दीपाली चव्हाण यांच्या आई आणि नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाबाहेरच ठिय्या दिला. 
भा.ज.पा.सह विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांनीही आंदोलन सुरू 
केले. 
जोपर्यंत श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन  होऊ देणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; 
पण तब्बल नऊ तास दीपाली यांचे नातेवाईक शवविच्छेदन गृहाबाहेर बसून होते. 
अखेर सायंकाळी उशिरा शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांनी परवानगी दिली. 
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशनसह  विविध संघटनांनी केली आहे. 
जाचामुळे कृत्य… 
शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने