(प्रभाकर आडगाळे.)मालपुर ता.शिंदखेडा
मालपूर - काल संध्याकाळी ढगांच्या गडगडाटसह वादळी वार्यांचे थैमान होते पाऊस कमी पण विजांचा गडगडात जास्त होता.महिला शेतकरी गुलाबबाई दलपत राजपुत गट क्रमांक२१३/३/१अ या गटात मोठे आंब्याचे झाड होते ते माञ वादळामुळे ऊस व मका पिकांवर पडल्यामुळे नुकसान झाले आहे. तसेच त्याच गटातील शेतकरी श्री.भगवान श्रावण पाटील यांच्या शेतात पाच सहा गायी व वासरे होते तेथेही एक जांभुळाचे भले मोठे झाड वादळी वार्यामुळे जमीनीवर कोसळले त्यात माञ एक गाय व वासरे दाबले गेले होते परंतु शेजारी शेतकरीश्री.विक्रमसिंग गिरासे.,नथथुसिंग राजपुत,सोनु पाटील राकेश पाटील,बब्लु पावरा यांनी घटनास्थळी धाव घेवुन मदतीला धावुन आल्याने जिवीत हानी टळली. अशी माहिती श्री.राकेश पाटील यांनी पञकार श्री.प्रभाकर आडगाळे यांना कळविली. माञ फळझाडांचे झालेले नुकसान पाहुनशेतकरी नाराज झाले. त्या संदर्भात महसुल विभागातील मालपुर सजा चे तलाठी श्री.व्हि.एन.गारे यांना पाचरण करण्यात आले आहे. तरी आज पंचनामासाठी येणारअसल्याचे सांगितले .
Tags
news

