अंबड हद्दीत घरफोडी करणारे 02 विधीसंघर्षीत बालकांकडुन ८७,000रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत




नाशिक शांताराम दुनबळे 

नाशिक --: मा. पोलीस आयुक्त, दीपक पाण्डेय सो, यांनी अंबड पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणा-यांचा शोध घेवुन  योग्य कारवाया करण्याबाबत  सुचना केली होती 
मा. पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मोहन ठाकुर सो(गुन्हे). पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली,  नुकतीच इकडील नेमणुकीचे पो हवा संपत सानप यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमी आधारे पोउनि मिथुन म्हात्रे, सहायक पो उपनिरीक्षक राजेंद्र जाधव. पो हवा संपत सानप, पो हवा राजेंद्र घुमरे, पो नाईक परमेश्वर दराडे, पो शिपाई  गौरव गवळी. जयंत शिंदे, योगेश सानप, बाळासाहेब नांदे. महेंद्र साळुंखे या पथकाने अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन विधीसंघर्षीत बालकांकडुन ९ मोबाईल, २ लैपटॉप, ६ होमथिएटर व ब्लुटुथ स्पिकर असे एकुण रू ८७.000/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलीस स्टेशन हद्दीत बबलु मोबईल, ए.आर. मोबाईल, मातोश्री मोबाईल व राठोड ब्रॅण्ड कलेक्शन या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असुन त्यांना पुढील कारवाईकामी अंबड पोलीस स्टेशन यांना कळविले आहे

सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं. 2 कडील अधिकारी व कर्मचारी, सपोनि अभिजीत सोनवणे, पोउनि मिथुन म्हा्ञे  पोउनि विजय लोंढे, पोउन दिपक देसले, सपोउनि राजेंद्र जाधव, पोहवा रमेश घडवजे, संपत सानप, राजेंद्र घुमरे, पो नाईक परमेश्वर दराडे, रतन सांगळे, मोतीलाल महाजन, पो शिपाई गौरव गवळी, जयंत शिंदे, योगेश सानप, बाळासाहेब नांदे, महेंद्र साळुंखे, यादव डंबाळे, चंद्रकांत बागडे, अमोल टर्ले, दयानंद सोनवणे, पो शिपाई कोमल यादव यांनी मदत केलेली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने