शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांनी केली अरुणावती नदी पात्र साफसफाई




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांनी अरुणावती नदी पात्र साफसफाई केली.

शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. शिरपूर वरवाडे शहरा लगत असलेल्या अरुणावती नदी पात्र साफसफाई नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक यांच्या वतीने करण्यात आली.

सदर पात्र साफसफाई करिता श्रमदान करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, आरोग्य सभापती नाजेराबी शेख यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम अंतर्गत नदीपात्रात असलेले झाडेझुडपे तोडून साफसफाई करण्यात आली. तसेच नदी पात्रात वाहुन आलेले प्लास्टीक, कपडे, इतर घाण संकलित करुन कचरा संकलन वाहनात टाकण्यात आला. तसेच पुढील विल्हेवाट करण्यासाठी पाठविण्यात आले.

सदर साफसफाई मोहीम ही न.पा. सफाई कर्मचारी यांनी केली तर श्रमदान मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेवक इरफान मिर्झा, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, स्वीय सहायक सुनील जैन, योगश्वर माळी, नोडल अधिकारी सागर कुलकर्णी, स्वच्छता निरिक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहायक दिपाली साळुंके, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, प्रज्ञशील निकम, राजु पाटील, भरत ईशी, प्रवीण रणदिवे, मुस्ताक हनीफ, इकबाल पिंजारी, व इतर उपस्थित कर्मचारी यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी जाहीर आवाहन केले की, नदी ही आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. तरी नागरिकांनी नदीत कचरा टाकू नये व पर्यावरणाचे सरंक्षण करावे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने