शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या कारवाईत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात एकूण 4360 रुपयाच्या महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मा.उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी निर्गमित केलेल्या आदेशात बाबत मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर यांनी महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यात बंदी असलेला नायलॉन मांजा दुकानदारावर सक्त कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमंत पाटील शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाचे कर्मचारी पो. हेड कॉ.उमेश पाटील, योगेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल बापूजी पाटील, नरेंद्र शिंदे स्वप्नील बांगर, अमित रणमळे, प्रवीण गोसावी, पंकज पाटील यांच्या पथकाने शिरपूर शहर भागातील खालचे गाव बालाजी मंदिर परिसर जवळ असलेल्या दोन किराणा दुकानदार यांच्या दुकानात छापा टाकून त्यांच्या दुकानात असलेल्या एकूण 4360 रुपये किमतीच्या नायलॉन मांजा हस्तगत करून त्यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Tags
news
