आर. सी. पटेल फार्मसीचे डॉ. हारून पटेल यांना "यंग फार्मसी टीचर ऑफ द इयर" अवॉर्ड

 


शिरपूर : आर. सी. पटेल फार्मसीचे डॉ. हारून पटेल यांना असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर इन इंडिया तर्फे "यंग फार्मसी टीचर ऑफ द इयर" अवॉर्ड देण्यात येणार आहे.
हा अवॉर्ड तरूणांद्वारे फार्मसीमध्ये शिक्षणाची गुणवत्ता आणि संशोधनाची गुणवत्ता वाढविण्याच्या साठी ए. पी. टी. आय. ने युवा फार्मसी शिक्षकांना त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांची व्यावसायिक वाढ होण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ४० वर्षे वयाखालील फार्मसी शिक्षकांसाठी खुला आहे. यात विद्यापीठे, महाविद्यालये आणि फार्मसीच्या शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत व ज्यांच्याकडे  संशोधन मध्ये त्यांची क्षमता स्थापित केली आहे त्यांना दिला जातो. हा पुरस्कार ए. पी. टी. आय. वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात देण्यात येईल. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व दहा हजार रु. रोख असे होते. या पुरस्कारासाठी भारतातून विविध मान्यवरांनी ऍप्लिकेशन पाठिवले होते. यात डॉ. हारून पटेल यांची फार्मसी शाखेत विविध स्तरावर अग्रगण्य काम केल्यामूळ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. हारून पटेल हे महाविद्यालयात फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना १२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून बी. फार्मसी मध्ये गोल्ड मेडलिस्ट, जामिया हमदर्द नवी दिल्ली येथून एम. फार्मसी मध्ये गोल्ड मेडलिस्ट, पंजाब विद्यापीठ चंदीगड येथून पीएच. डी. यात फुफ्फुसाचा कर्करोगा साठी संशोधन केले आणि यूकेझेडएन-वेस्टविले, डर्बन येथून पोस्ट डॉक्टोरियल फेलोशिप केले. त्यांना आर. व्ही. पटेल, फार्मइन्नोवा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट थेसिस पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

त्यांना डीएसटी व आयसीएमआर, नवी दिल्ली कडून ८० लाख रुपयांचे संशोधन अनुदान प्राप्त झालेला आहे. नामांकित जर्नल्समध्ये त्यांच्याकडे ७७ हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशने आहेत. त्यांनी ०४ पुस्तके प्रकाशित केली आहेत, ०२ पेटंट प्रकाशित, ०८ पेटंट साठी अप्लाय केलेले आहे, आणि ३० एम. फार्मसी कार्याचे मार्गदर्शन काम पाहिले आहे. सेमिनार आणि परिषदेसाठी आमंत्रित स्पीकर आहेत. सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील शैक्षणिक समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहतात.

या पुरस्कारा साठी संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हसवानी आदींनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने