शिरपूर : येथील एस.व्ही.के.एम. संचालित एन.एम.आय.एम.एस. मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग शिरपूर येथे "आपत्ती – मानसिक, सामाजिक काळजी" या विषयावर दि. 14 ते 16 डिसेंबर 2020 दरम्यान तीन दिवसांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
“विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षित करणे आणि सक्षम करणे” या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कोविड–19 या साथीच्या महामारीमुळे जगभरात भीती व चिंतेचे वातावरण आहे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत एस.व्ही.के.एम. संस्थेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (एनआयडीएम), नवी दिल्ली यांच्या समवेत मानसिक हस्तक्षेपाकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोज बिंदल यांनी मुख्य वक्ते म्हणून कार्यशाळेला संबोधित केले. त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. एमपीटीपी शिरपूर कॅम्पसचे संचालक डॉ. आर. एस. गौड यांनी स्वागतपर भाषण केले. एमपीएसटीएमई शिरपूरचे प्रभारी संचालक डॉ. नारायण चांडक यांनी एसव्हीकेएम एनएमआयएमएस च्या वतीने सर्वांचे ऋण व्यक्त करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. एनआयडीएमचे अरुण वर्मा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी एनआयडीएमचे कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोज बिंदल यांनी अनमोल
कार्यशाळेच्या तिसर्या दिवशी डॉ. आशा (प्रख्यात मानसशास्त्रज्ञ) यांनी भावनिक जखम, अपमान आणि पीडितांच्या असंतुलन याबद्दल चर्चा केली. साथीच्या आजाराच्या परिस्थितीतही त्यांनी पुरातन वैदिक तंत्रे आणि अवलंब करण्याच्या पद्धतीचा उल्लेख केला. डॉ गिरीश मिश्रा (प्राध्यापक, ओ. पी. जिंदाल विद्यापीठ) यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या दुर्घटनांचे परिणाम आणि यामुळे बचाव कार्यात गंभीर असंतुलन कसे उद्भवते यावर विवेचन केले. मिस किरण (समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ, एनएमआयएमएस शिरपूर) यांनी भावनिक लचकता निर्माण करून संकटाच्या काळातून उत्कर्षावर व्याख्यान दिले. कार्यशाळेसाठी
डॉ. कमल मेहता (प्राध्यापक, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. वरुण देशमुख, प्रा. धनंजय जोशी, रूपेश पाटील (संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, एमपीएसटीएमई, शिरपूर) यांनी केले.
कार्यक्रमास व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पस संचालक डॉ. आर. एस. गौड, डॉ. नारायण चांडक, मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांचे मार्गदर्शन व अनमोल सहकार्य लाभले.
