तपनभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीसाठी "तपनभाई किसान समृद्धी योजना" मार्फत शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या साठी कृषी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद



शिरपूर : शेतकरी बांधव यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी मोठे योगदान देण्याची गरज आहे. अहमदाबाद येथून पटेल परिवाराची सुकन्य  मेहा दीदी शरविलभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या कल्याणासाठी महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जागृत व्हावे. तपनभाई पटेल यांचे अनेक स्वप्ने पूर्ण करण्याचे काम आम्ही करीत आहोत. द्वेता पटेल देखील आदिवासी भागातील महिला यांच्या साठी विशेष कार्य करीत आहेत. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू या. अनेक योजना आम्ही घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपल्याला सकारात्मकतेने काम करावे लागेल. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता मत्स्य व्यवसायाला देखील चालना देण्याचे काम आपण करतोय. महिला भगिनी यांचे प्रत्येक कुटुंबात योगदान खूप आहे. सर्वांनी काटकसरीने काम करणे आवश्यक असून महिला ही घरात लक्ष्मी आहे असे भावपूर्ण मनोगत यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी व्यक्त केले.


तपनभाई  पटेल यांच्या स्वप्नपूर्तीसाठी "तपनभाई किसान समृद्धी योजना" मार्फत शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या साठी कृषी कार्यशाळा बुधवार दि. १३ जानेवारी रोजी श्री गणेश पूजन स्व. तपनभाई पटेल प्रतिमा पूजन करुन उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली.


आमदार काशीराम पावरा यावेळी म्हणाले, शेतकरी हा सर्व खाते व विभाग यांच्याशी जुळला आहे. सर्व खात्याने व्यवस्थित सहकार्य केले तर शेतकरी निश्चित सुखी होईल. अनेक योजना सहज सोप्या वाटतात परंतु अधिकारी यांच्या प्रयत्नाने योग्य कार्यवाही व्हायला व्हावी. सरळ हाताने योजना दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांना अनेक योजनांमध्ये फार त्रास होतो. शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु त्यांना फार फिरावे लागते. शेतकरी राजा खूपच हुशार आहे पण त्याला खूप त्रास होतो. अनेक अडचणी असून त्यांचा त्रास प्रशासनाने कमी करावा. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकरी राजा सुखी होण्यासाठी सर्व अधिकारी यांनी लक्ष घालावे. अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल हे नेहमीच प्रयत्नशील असतात असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आत्मा योजना धुळे येथील प्रकल्प उपसंचालक शांताराम मालपुरे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर  धुळे कृषी विभागाचे डॉ. दिनेश नांद्रे, कृषी विज्ञान केंद्र उद्यान विभागाचे डॉ. रोहित कडू, शिरपूर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. कुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, शिरपूर शेतकरी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, वसंत पावरा, सुभाष कुलकर्णी, कारखाना व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, खरेदी विक्री संघ व्हाईस चेअरमन प्रकाश गुजर, रमण भाऊसाहेब पावरा, योगेश बादल, राजेंद्र पाटील, नारायणसिंग चौधरी, सत्तारसिंग पावरा, काशिनाथ राऊळ, दर्यावसिंग जाधव, अविनाश पाटील, बन्सीधर पाटील, प्रकाश पाटील, योगेश बोरसे, सर्जेराव पाटील, तालुका कृषी अधिकारी निकुंभ, मोरे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना 'आत्मा' योजना प्रकल्प उपसंचालक  शांताराम मालपुरे म्हणाले, विविध शेती तंत्रे विकसित व्हावे यासाठी अशी कार्यशाळा खूप उपयुक्त आहे. कृषी विभाग अंतर्गत गट कार्यरत ठेवणे, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करून एकत्र काम करणे यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. शेतकरी उत्पादक हे बाजारपेठेत महत्त्वाचा घटक आहे. शासनाकडून 2020-2021 पासून 2026-2027 पर्यंत स्मार्ट प्रकल्प योजना सुरु झाली असून त्याचा लाभ घ्यावा. विविध छोट्या मोठ्या स्वरूपात शेती व्यवसाय संबंधीत कंपनी काढू शकतात. महिला भगिनी हे सुद्धा विविध प्रकल्प सुरू करू शकतात. माता भगिनी पुढे आल्यास विविध प्रकल्पाला चालना मिळू शकते.

डॉ. कडू म्हणाले, तांत्रिक सत्र शेतकरी यांच्या साठी गरजेचे असून आपल्या तालुक्यात भाजीपाला उत्पन्न जास्त आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात चांगले उत्पन्न घेतले जाते. भेंडी, मिरची, टमाटे, केळी, पपई या पिकांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान याचा वापर करावा.
चांगल्या कृषी योजनांना, कृषी प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. भाजीपाला प्रक्रिया, पिकांवर प्रक्रिया योजना राबवा.

डॉ. नांद्रे म्हणाले, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना परवडेल असे तंत्रज्ञान आवश्यक असून शेती टिकविण्यासाठी एक पिक पध्दती पुरेशी योग्य नाही. शेतकरी राजा मोठा व्हावा यासाठी प्रयत्न व्हावे. 90 टक्के शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही, तरी शेती आपण सोडू शकत नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहण्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सर्व खटाटोप सुरु आहे. शेतीशास्त्र समजून घ्यावे, रसायनांचा मारक परिणाम असल्याने शेती माती उत्पादकता ऱ्हास,  शेतीज्ञान देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, शेती पध्दतीमध्ये बदल करा. सेंद्रिय शेती आवश्यक, पूर्वी धुळे जिल्हा सेंद्रिय शेती साठी प्रसिद्ध होता. एकमेकांच्या साहाय्याने गटाच्या माध्यमातून कुशल शेती करावी, एकमेकांना सत्य कथन करा, एकमेकांना विश्वास दाखवा. शेतीपूरक व्यवसाय करावा.

तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. कुवर म्हणाले, पशुधन शिवाय पर्याय नाही. पूर्वी पशुधन जास्त होते तर आजार देखील कमी होते. पंतप्रधान मोदीजी म्हणतात
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करा, त्यासाठी केमिकल शेतीकडे वळण्याऐवजी सेंद्रिय शेती कडे जावे.
पशु पालन व्यवसाय गरजेचा आहे. कुक्कुटपालन अनुदान योजना, वैरण विकास योजना, अनेक कृषी योजना अमलात आणाव्या. गुरांसाठी काळजी घ्या, उपचारासाठी योजनेचा लाभ घ्यावा, गुरांना प्रतिबंधक लस टोचणे, शासन योजनेचा लाभ घ्यावा, लसीकरणाला प्रोत्साहन द्या. दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा, नफ्याचे अनेक प्रकल्प, उपक्रम आहेत.


प्रास्ताविकात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी माहिती दिली. शेती चळवळ बाबत तपनभाई पटेल यांनी फार पाठपुरावा केला होता. बाह्यापाडा धडगाव येथे
मेहा दीदी पटेल (झायडस कॅडीला, अहमदाबाद) यांनी मोठ्या कामाला सुरुवात केली आहे. शिरपूर तालुक्याच्या शेतकरी यांच्या प्रगती साठी लखपती किसान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यात 70 शेती गट तयार केले आहेत. "तपनभाई किसान समृद्धी योजना" राबवली जात असून या योजने अंतर्गत गट तयार करून शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना समृद्ध करण्याचे काम सुरू केले आहे. पटेल परिवाराचे स्वप्न सर्व शेतकरी बांधवांचा शेवटच्या माणसाचा फायदा व्हावा असे असून त्या दृष्टीने कार्य सुरु आहे. सूत्रसंचालन
सुभाष कुलकर्णी यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने