थाळनेर - शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 4,62,000 किमतीचे दारू साठा व वाहन असा मुद्देमाल जप्त करून धाडसी कारवाई केली आहे.
थाळनेर पोस्टे हद्दीत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 20/21अनुषंगाने हद्दीत दिनांक 14/ 01/2021 रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या लगत असलेल्या पिंप्री फाट्याजवळ एक चार चाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्या माहिती वरून सापळा लावला असता Hyundai accent कंपनीचे वाहन क्रमांक GJ 05 CF 4470 यात एकूण bombay visky विदेशी दारूचे 50 बॉक्सची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले त्याना वाहनासह ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून एकूण 3,12,000/- रुपये किमतीचे दारूचे एकूण ५० बॉक्स तसेच एक चार चाकी वाहन किंमत अंदाजे 1,50,000 /- असा एकूण 4,62,000/- रुपये किमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाही करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक धुळे मा.चिन्मय पंडित सो, तसेच अपर पोलीस अधीक्षक धुळे मा.प्रशांत बच्छाव सो, तसेच s शिरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो.यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे ,पी एस आय नवनाथ रसाळ, पोलीस कॉन्स्टेबल,सिराज खाटीक
उन्मेष आंळदे,नरेंद्र पवार,प्रकाश मालचे,
विजय जाधव आणि पथकाने कारवाई केली आहे.
Tags
news
