डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी




शिरपूर:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आदरणीय *ताईसो आशाताई रंधे* यांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री शिक्षणाची साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची ओळख आशाताई रंधे यांनी करून दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री भूमिका ही खूप महत्वपूर्ण असते असे प्रतिपादन त्यांनी केले. आज समाजात प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषा बरोबर आपले कर्तुत्व सिद्ध करते आहे ह्याचे श्रेय सर्वस्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जात. हया प्रसंगी उपशिक्षिका रमाकांती विश्वकर्मा यांनी हे शारदे मा ही प्रार्थना म्हणून भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यावेळी शाळेच्या प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार मनीषा पाटील व शिक्षक बंधू भगिनीं उपस्थीत होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने