----------------------------------------
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी सहा जानेवारी हा दिवस पत्रकारदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे आज अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा पोलिस अधीक्षक मा. अशोक दुधे, लोकमत चे उपसंपादक मा. आविष्कार देसाई, पुढारीचे उपसंपादक मा. जयंत धुळप, टिव्ही वन चे संपादक मा. सुधीर शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला होता.
यावेळी बोलताना सर्वच पाहुण्यांनी पत्रकार उत्कर्ष समिती च्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार व उच्च न्यायालयाचे वकील मा. ॲड. विजय पाटील , साप्ताहिक रायगड चे संपादक डॉन के. के. यांच्यासह पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, कार्याध्यक्ष मा. अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराडे, सचिव डॉ. वैभव पाटील,सहसचिव अमोल सांगळे, खजिनदार शैलेश ठाकुर, सदस्या रुपा सिन्हा, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम जाधव, कोकण अध्यक्ष अलंकार भोईर, रायगड संघटक जगदीश दगडे, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव, मुंबई अध्यक्ष पंकज कुमार पाटील, अंबरनाथ अध्यक्ष शैलेश सणस, रायगड सदस्य व निवेदक विश्वनाथ गायकवाड, महिला उत्कर्ष समिती पनवेल शहर अध्यक्षा सना सय्यद यांच्या सह मोठया संख्येने पत्रकार बंधू भगिनी उपस्थीत होते.
Tags
news
